वऱ्हाडाचा आयशर उलटून १ ठार, ३५ जण जखमी

Foto
सिल्लोड - कन्नड रस्त्यावर धानोरा फाट्याजवळील अपघात; आठ जणांची प्रकृती गंभीर

सिल्लोड, (प्रतिनिधी) लग्नाचे वन्हाड घेऊन चाललेले आयशर वाहन उलटल्याने एकजण ठार झाला तर ३५ जण जखमी झाले. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली. हा अपघात शुक्रवारी (दि. २०) पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास सिल्लोड कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ घडला.

रेखाबाई वसंत गोसावी (रा. बोदवड, जि. जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. जळगावकडून लग्नाचे वन्हाड घेऊन आयशर (एमएच १९ सीएक्स ३२५४) श्रीरामपूरकडे जात होती. या वाहनात जवळपास ३५-४० जण होते. हे वाहन धानोरा फाट्याजवळ येताच रस्त्याच्या खाली उतरून विजेच्या खांबाला धडकले आणि पलटी झाले. यात विजेचे खांब वाकून वीजवाहक तार गाडीच्या बाजूला पडली. तारांमध्ये वीजप्रवाह असल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाली.

जीव धोक्यात घालून पोलिसांसह ग्रामस्थांनी केली मदत याविषयी माहिती मिळताच गस्तवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार यतीन कुलकर्णी, संजय आगे, भिक्कन सतुके यांनी अपघातस्थळी धाव घेतली. या अपघताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

एकीकडे गाडीजवळ वीजप्रवाह तारांची मोठ्या प्रमाणात होणारी स्पार्कि तर दुसरीकडे अधार. अशात मदत करणे जिकरीचे होते.  परिस्थितीत पोलिसांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पीठ धोक्यात घालून एक एक करुन गाडीमधील जखमींना बाहेर काढत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.